नाशिक : एकीकडे भाजप सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत आरक्षणाचा टक्का वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे आरक्षणमुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागत असल्याचं वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे.


नाशिकमध्ये चित्पावन ब्राम्हण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केल्याची बातमी दैनिक सकाळने दिली आहे.

मुक्ता टिळक यांचं स्पष्टीकरण

नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झालं पाहिजे असंही यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या. त्यामुळे मोदी सरकारला 3 वर्षे उलटल्यानंतरही देशात उद्योग आणि नोकरीसाठी पूरक वातावरण निर्माण झालेलं नाही का, असा प्रश्न निर्माण होतो आहे.