नर्मदा नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू, एक बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2019 05:44 PM (IST)
जिल्ह्यातील सर्वच प्रशासन मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेतील अन्य प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
नंदुरबार : नर्मदा नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला असून एकाची ओळख पटली नाही. तर एक जण बेपत्ता आहे. या बोटीत एकूण 62 प्रवासी होते. यातील 47 जण किरकोळ जखमी असून त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर धड़गाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (मंगळवारी) दुपारी नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ ही घटना दुर्घटना घडली. मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदेच्या पात्रात 62 भाविक अंघोळीसाठी बोटीत बसले असताना ही दुर्दैवी घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून 57 जणांचे जीव वाचले आहेत. दुर्घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू झाल्यानंतर भाविकांना वाचवण्यात आले. या दुर्घटनेतील अन्य प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. अतिशय दुर्गम भागात ही दुर्घटना घडली आहे. नर्मदा नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावं भुपेंद्र भरत पावरा - 4 वर्ष - नेळखेडी गिता बिलदार पावरा - 12 वर्ष - नेळखेडी लक्ष्मी भरत पावरा - 4 वर्ष - नेळखेडी तुलसी रतीलाल पावरा - 5 वर्ष - नेळखेडी मानु काल्या पावरा - 60 वर्ष - नेळखेडी