पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. भरधाव कारसमोर अचानक बाईकस्वार आल्यामुळे तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला.

आंबोली भागात दोन कार आणि एका बाईकमधे अपघात होऊन सहा जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारसमोर बाईकस्वार आल्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त शहा कुटुंब हे मुंबईतील कांदिवली भागातील रहिवासी होते.

महामार्गावर हॉटेल चालक आणि पेट्रोल पंप चालक यांच्या फायद्यासाठी अनेक अनधिकृत कट तयार करण्यात आले असून अशाच एका अनधिकृत कटच्या ठिकाणी बाईकस्वार समोर आल्याने हा अपघात घडला आहे. अशा ठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे

VIDEO | लोकांची बघ्याची भूमिका अपघातग्रस्ताच्या जीवावर | औरंगाबाद | एबीपी माझा



मृतांची नावे

1) प्रतिभा परिमल शहा (70 वर्षे) (रा. कांदिवली)
2) राकेश परिमल शहा (50 वर्षे) (रा. कांदिवली)
3) आकाश चव्हाण (42 वर्षे) (रा. कांदिवली)
4) नवनाथ रमाकांत नवले (25 वर्षे) (रा. मोखाडा)
5) बी डी जाधव (57 वर्षे) (रा. पनवेल)
6) दिलीप चंदने

जखमींची नावे

1) जिनल शहा (24 वर्षे) (रा. कांदिवली)
2) नारायण सुपे (45 वर्षे) (रा. मोखाडा)

मयत बी डी जाधव हे मनोर येथील सूर्या प्रकल्पामधे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते