सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आंबोलीच्या लॉजमधील तरुणाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं आहे. मृत तरुण जोझिंदर बलदेवसिंह विर्क (वय 25 वर्ष) हा मूळचा पंजाबचा आहे. परंतु त्याने अमृतसरमधून अपहरण करुन आणलेली तरुणी बेपत्ता आहे.
तीन दिवसांपूर्वी आंबोलीत सकाळी अकराच्या गाडी बंद पडल्याने जोझिंदरने लॉजमध्ये आसरा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. शिवाय त्याच्या गाडीमध्ये कोयता, सुरी, रक्ताचे डाग, एक चिठ्ठी आणि सीरिंज सापडल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
या तरुणाने अमृतसर इथल्या प्राध्यापक तरुणीचं अपहरण करुन पलायन केलं होतं. परंतु ही तरुणी कुठे बेपत्ता झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
गाडी बंद पडली असून आपली माणसं गोव्याहून येणार आहेत. तोपर्यंत मला रुम भाड्याने द्या, असं सांगत जोझिंदरने मंगळवारी दुपारी लॉजमधील खोली भाड्याने घेतली. ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड दिलं. पॅनकार्डची नोंदही मालकाने यांनी रजिस्टरमध्ये केली.
मंगळवारीही त्याचे मित्र न आल्याने हॉटेल मालकाने बुधवारी सकाळपासूनच रुम कधी सोडणार, अशी विचारणा केली होती. त्यानंतर पुन्हा विचारणा करण्यासाठी मालक खोलीकडे गेला. दरवाजा ठोठावूनही आतून आवाज आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले असता तरुणाने छताला गळफास घेतल्याचं निदर्शनास आले.
या संदर्भात आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार विश्वास सावंत, गजानन देसाई यांना कळवण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन पंचनामाही करण्यात आला.
पंजाबमधल्या तरुणाची आंबोलीत आत्महत्या, अपहरण केलेली तरुणीही बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2017 03:21 PM (IST)
या तरुणाने अमृतसर इथल्या प्राध्यापक तरुणीचं अपहरण करुन पलायन केलं होतं. परंतु ही तरुणी कुठे बेपत्ता झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -