मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवलं. एवढंच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतोय तो तुम्ही पण आज अनुभवावा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.
तसंच संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असं म्हणत नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलपर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. शिवाय कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली.
मुंबई : 'मातोश्री'बाहेरचा परिसर फेरीवाल्यांनी व्यापून टाकू, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा