Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 4 जुलै 2019 | गुरुवार

चिपळूणच्या तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 वर, आठ जण अजूनही बेपत्ता, धरणापासून 7 किलोमीटरवर मृतदेह आढळले, तक्रार करुनही अक्षम्य दुर्लक्ष

मराठवाड्यातील बहुतांश भाग अद्यापही कोरडाच, पेरणीयोग्य पाऊन नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, जुलैपर्यंत सरासरीचा फक्त 11 टक्के पाऊस

मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास आता 440 रुपयांत, शिवनेरी आणि अश्वमेध बसच्या दरात 80 ते 120 रुपयांची कपात, सोमवारपासून नवे दर लागू

राज्य शासनाच्या मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, शासनाच्या विविध विभागांत रिक्त असलेल्या पदांवर लवकरच भरतीला सुरुवात होणार

लोकांच्या मागणीनंतरच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा, रोहित पवारांचा फेसबुकवरुन खुलासा



अहमदाबादमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात, गृहमंत्री अमित शाहांकडून आरती, हजारो भाविकांची गर्दी

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार, नव्या अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत मोतीलाल व्होरांकडे पदभार, ट्विटरवरुनही उल्लेख हटवला

डाऊन झालेले व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा पूर्ववत, काल संध्याकाळी काही तास डाऊनलोडिंग बंद राहिल्यानंतर आता डाऊनलोडिंग सुरु

विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेण्याची शक्यता, पीटीआय वृत्त संस्थेची माहिती, तर विश्वचषकातून डावलल्यानं अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा

विश्वचषकात यजमान इंग्लंडकडून न्यूझीलंडचा 119 धावांनी धुव्वा, इंग्लंड बारा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर