Sindhudurg District Bank Election Results Live updates : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक: भाजपचा मोठा विजय, भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागा

Sindhudurg District Bank Election Live updates :संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. पाहा प्रत्येक अपडेट्स

abp majha web team Last Updated: 31 Dec 2021 12:15 PM

पार्श्वभूमी

Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला...More

मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!