श्रीपाद छिंदम अहमदनगर शहरात दाखल झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली होती. छिंदमविरोधात नगरमध्ये उद्या शिवसन्मान मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
छिंदमची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदमविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. श्रीपाद छिंदमला 16 फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली होती. तर 13 मार्च रोजी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर त्याची नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली.
छिंदमवर भाजपची कारवाई
"शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे," अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
श्रीपाद छिंदमचा माफीनामा
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनावधनाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे माफी मागतो आणि प्रायश्चित्तास तयार आहे, अशा आशयाचे पत्र श्रीपाद छिंदम याने अहमदनगरचे महापौर, मनपा आयुक्त आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांना पाठवलं होतं.
संबंधित बातम्या :
छिंदम हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आलाच नाही!
श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका, अज्ञातस्थळी रवाना
छिंदमला जामीन मंजूर, कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार
उपमहापौर छिंदमचा राजीनामा मंजूर, नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी
छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्ताप
नगर पोलिसांचा चकवा, छिंदमला येरवाड्याला सांगून नाशिक जेलमध्ये नेले!
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत