बुलडाणा : आपल्याकडील लोकांमध्ये क्रिएटिव्हीटी कुटुन कुटून भरलीय. लोक काय करतील याचा काहीच नेम नाही. बुलडाण्यात एक व्यक्ती आपल्या मागणीसाठी बीएसएनएलच्या टॉवर चढला आणि त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता ह्याच व्हिडीओवर आपली कला कौशल्य वापरून हे व्हिडीओ आता अनेक लोकांनी आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवले आहेत.


बुलडाण्यात एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या अनेक मोबाईलच्या व्हाट्सअपचा स्टेट्स बनला आहे. तेही साधे सुधे नव्हे तर आपली क्रिएटिव्हीटी वापरुन हे स्टेट्स बनवले आहेत. स्टेट्स कमी होतात म्हणून काय तर काहींनी आपली क्रिएटिव्हीटी दाखवत याचे व्हिडीओ युट्यूबवर ही अपलोड केले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे ही व्यक्ती? यांनी काय असा पराक्रम केला की तो सध्या अनेकांना आपल्या मोबाईलचे स्टेट्स ठेवावं लागल आहे.



बुलडाणा जिल्ह्यातील सव गावच्या 35 वर्षीय गजानन रोकडेचे हे व्हिडीओ आहेत. तो पेशाने ड्रायव्हर आहे. जय आणि ओम ही दोन मुलं, आई आणि पत्नीसह तो राहत होता. पण आनंदाने नाही कारण त्याला दारू पिण्याची वाईट खोड! यामुळे घरात नेहमी भांडणे होत होती. भाजीपाला विक्रीचे सर्व व्यवहार तसा बायकोकडे असायचा, पण दारू प्यायला पैसे मिळाले नाही की, घरात भांडणच भांडणं. मग त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न झाला. आईला पण भाजीपाला विक्रीसाठी गजाननने तयार केले. सासु-सुना मिळून भाजीपाला विकत होते. किमान 400 रुपयांपर्यंत प्रतिदिन कमाई व्हायची. तो कुठे गाडीची ट्रिप मिळाली की, ड्रायव्हर म्हणून जात होता. आलेली कमाई बायकोकडे न चुकता द्यायचा.


बायको न दिसल्यामुळे गजानन सासरे आणि मेव्हण्यावर बिथरला


पण, कोरोना आला आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. आर्थिक चणचणीने कुटुंबातील कलह वाढला होता. त्याला काम मिळेनासे झाले. दारुसाठी पैसे कुठून मिळणार? शेवटी पती-पत्नीमध्ये भांडण जुंपायचे. यातून एकदा सर्व पैसे घेवून अनिता पिंपळगांवराजाला माहेरी गेली होती. कशीबशी समजूत काढून गजाननने तिला आणले होते. पण, पुन्हा पुन्हा भांडणतंट्यांनी कंटाळून मागच्या 26 जून रोजी अनिताने माहेर गाठले. सोबत पैसेही घेवून गेली. इकडे गजानन बायकोविणा आणि पैशाविणा त्रासून गेला होता. काही दिवसांनी तो अनिताला घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपळगांवराजाला पोहोचला. बायको तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी मुक्ताईनगरला गेलेली होती. बायको न दिसल्यामुळे गजानन सासरे आणि मेव्हण्यावर बिथरला. तिथे मेव्हण्याने गजाननला हाणामारी केली. मेव्हण्याविरोधात तक्रार घेवून गजानन पिंपळगांवराजा पोलीस स्टेशनला गेला. तक्रार नोंदविली आणि वैद्यकीय तपासणी होण्यापूर्वीच खामगांवला न जाता सरळ बुलडाण्याला परतला.


मुंबईतील जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड; आरोपी वॉर्डबॉयला अटक


पत्नीसाठी हे महाशय टॉवर वर
येथील शहर पोलीस स्टेशनला जावून त्याने मेव्हण्याने मारल्याची तक्रार सांगितली. मारहाणीचे ठिकाण पिंपळगांवराजा असल्यामुळे इथल्या पोलिसांनी पिंपळगांवराजाशी संपर्क साधल्यावर कळले की, गजाननची तक्रार नोंदविलेली आहे. पण वैद्यकीय तपासणी बाकी आहे. इथूनही गजानन सटकला. बायको फोन घ्यायला तयार नव्हती, खिशात दमडी नव्हती. काय करावे सुचेनासे झाल्याने गजाननने शक्कल लढविली. बायकोला बुलडाण्याला परत आणण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग काय, आपल्या पत्नीसाठी हे महाशय दुपारी बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगतच्या तीनशेहून अधिक फूट उंच असलेल्या बीएसएनएलच्या टॉवर वर चढले.



घटनेचे व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर सुरू झाली धावपळ. प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासनही लगेच घटनास्थळी हजर झालं. मग त्याला खाली उतरन्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जवळपास अडीच तास तो टॉवरवर बसून होता. प्रशासन पुरतं हतबल झालं होतं. त्याच्याशी फोन वर संभाषणही सुरू होतं. घटनास्थळी त्याची आई आणि त्याची दोन मुलं ही आणण्यात आले होते. जेव्हा त्याच्या पत्नीशी प्रशासनाने संपर्क साधला, ती इथं येण्यासाठी राजी झाली. जेव्हा ही सर्व माहिती गजानन रोकडे यांना देण्यात आली. जेव्हा त्याला शास्वती झाली की आपलं काम झालं. तेव्हा तो अडीच तासाने खाली उतरला. हा सर्व प्रकार लोकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. याचेच व्हिडीओ लोकांनी व्हाट्सएपचे स्टेट्स म्हणून ठेवले आहेत. ते सर्वत्र शेयरही होत आहेत.


VIDEO | 700 मेगावॉटच्या विद्युत टॉवरवर महिला चढली | गडचिरोली | ABP Majha