मुंबई : पीएफआयवर (PFI) टाकलेल्या धाडींनंतर पीएफआयचे कट समोर आले. पीएफआयनं पंतप्रधान मोदींनी (PM Modi) मारण्याचा कट आखला होता. हे एटीएसच्या तपासात समोर आल्याची माहिती मिळाली. पण आता पीएफआयच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होतं अशीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती दिली आहे. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
पीएफआय प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आलीय. महाराष्ट्र एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपचे काही अनेक बडे नेते पीएफआयच्या रडारवर होते. पीएफआय अनेक हिंदू नेत्यांना टार्गेटवर ठेऊन काम करत असल्याची माहिती एटीएसला प्राथमिक तपासातून मिळाली आहे. इतकंच काय तर, नागपूर स्थित संघ मुख्यालयही पीएफआयच्या निशाण्यावर होतं. अटक करण्यात आलेल्या पीएफआय केसमधील आरोपींच्या चौकशीतून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेसोबत महाराष्ट्र एटीएसनं विविध शहरांमध्ये छापे टाकून महाराष्ट्रातून सर्वाधिक 20 लोकांना ताब्यात घेतलं आहे. एटीएसनं मुंबईतून अटक केलेल्या 5 आरोपींना सोमवारी कोर्टापुढे हजर करण्यात आलं. या सर्व आरोपींची एटीएस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा कोर्टापुढे हजर केलं असता विशेष कोर्टानं त्यांची रिमांड 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिली आहे.
येत्या काळात या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ज्यातनं एका मोठ्या देशविरोधी कारवाईची पाळमुळं खणून काढण्याच्या प्रयत्नात तपासयंत्रणा काम करतेय. मात्र सर्वात महत्वाचं पीएफआयला या संपूर्ण ऑपरेशनसाठी टेरर फंडिंग कुठून होतंय?, कोण त्यांच्या टार्गेटवर होतं?, यासंदर्भात एटीएस अधिक मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे.
येत्या काळात या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ज्यानंतर एका मोठ्या देशविरोधी कारवाईची पाळमुळं खणून काढण्याच्या प्रयत्नात तपासयंत्रणा काम करतेय. मात्र सर्वात महत्वाचं पीएफआयला या संपूर्ण ऑपरेशनसाठी टेरर फंडिंग कुठून होतंय?, कोण त्यांच्या टार्गेटवर होतं?, यासंदर्भात एटीएस अधिक मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
PFI : पीएफआयच्या फरार कार्यकर्त्याला औरंगाबादमध्ये अटक, महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
PFI च्या संस्था असेल तिथे झोडून काढलं पाहिजे, पोलिसांनी कारवाईला विलंब करु नये - चंद्रशेखर बावनकुळे