Shivswarajya yatra of NCP Sharad Chandra Pawar party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून (14 ऑक्टोबर) बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहे. यात्रेचा उद्यापासून हा शेवटचा टप्पा असेल. या यात्रेची सांगता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये होणार आहे. सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, येत्या आठवड्यामध्ये विधानसभेसाठी बिगुल फुंकले जाण्याची शक्यता आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 14, 15 आणि 16 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल. 


इचलकरंजी आणि कागलमध्ये शिवस्वराज यात्रा जाणार


उद्या 14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांचा पक्षप्रवेश फलटणमध्ये होणार आहे. यात्रेतच हा पक्षप्रवेश होईल. या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत. 15 तारखेला यात्रा इचलकरंजीमध्ये पोहोचेल. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आणि कागलमध्ये अशा दोन मतदारसंघांमध्ये ही शिवस्वराज यात्रा जाणार आहे. 


हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर


त्यामुळे कोल्हापूरमधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असतील. कागलमधील सभेसाठी कोण कोण नेते उपस्थित राहणार याकडे सुद्धा लक्ष असेल. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीसाठी कागलची जागा प्रतिष्ठेची होऊन गेली आहे. या ठिकाणी भाजपचे समरजितसिंह घाटगे यांना शरद पवारांनी पक्षांमध्ये घेत उमदेवारी देतानाच मंत्रीपदाचे सुद्धा सुचवात केले आहेत. तेव्हापासून हसन मुश्रीफ आणि घाटगे यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला आहे. हसन मुश्रीफांकडून होत असलेल्या टीकेला  कोणत्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाणार याचीही उत्सुकता असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या