Baba Siddiqui Murder case : माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या (Baba Siddiqui Murder case) झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींची (accused) ओळख पटली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे. मोहम्मद जीशान अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 


 






बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकूण तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी फरार होता. अशातच आता चौथ्या आरोपीची देखील ओळख पटली आहे. 


आरोपींकडे 28 जिवंत काडतूस सापडली


बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. आरोपींच्या वकिलांकडून आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात करण्यात येतोय. दरम्यान सरकारी वकिलांनी देखील न्यायालयात युक्तिवाद केला आहे. "या आरोपींकडे 28 जिवंत काडतूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी (Baba Siddique) यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता", असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. 


लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली


लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख  पटल्याची माहिती समोर आली आहे.  काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच  पोस्टमध्ये केला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुण्याचा 'शिवा' नेमकं काय करतो?