सांगली: मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची पायाभरणी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील “आझादी के 70 साल – जरा याद करो कुर्बानी” या कार्यक्रमांतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
'' मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक कीर्तीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्यानुसार अरबी समुद्रात सर्वात मोठा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभारला जाणार आहे. त्याच्या कामाची सुरुवात पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे,'' असे सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले.