मुंबईः मुख्यमंत्र्यांनी दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अजुर्न खोतकर यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन 'आप'ने केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

 

मुख्यमंत्र्यांनी या विनंतीवरुन मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गरज पडल्यास एसीबीमार्फतही खोतकरांच्या आरोपांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

 

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत खोतकर यांनी सभापती या नात्याने 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन यांचा आहे. खोतकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे चौकशी करण्याची मागणी केली.