नाशिक : नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या दोन गटात वाद राडा झाला. माजी महापौर विनायक पांडे आणि शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते समर्थक भिडले.


यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. नाशिमधील चांडक सर्कल परिसरात ही घटना घडली.

चांडक सर्कल परिसरात एबी फॉर्मचं वाटप सुरु होतं. त्यावेळी विनायक पांडे आणि अजय बोरस्ते यांच्यात बाचाबाची झाली. या शाब्दिक चकमकीचं रुपांतर हाणामारीत झालं. या राड्यात अजय बोरस्ते यांना मारहाण झाली आहे.