मुंबई: ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकावर आक्षेप घेतलेला असतानाच, शिवसेनेच्या शिंदे गटाने (Eknath Shinde) ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस बजावली आहे. ठाकरे गटाच्या चार खासदारांना ही नोटीस बजावली आहे. व्हिप न पाळता, महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानाला अनुपस्थित राहिल्यानं शिंदे गटाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी ही नोटीस बजावली.


महिला आरक्षणाचा व्हिप न मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई करणार असल्याचे संकेत शिंदे गटाचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहेत. शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी 14 सप्टेंबरला व्हिप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं भावना गवळी यांनी व्हिपद्वारे म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे चार खासदार हे अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 


या चार खासदारांना नोटीस 


लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोदपद खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र ठाकरे गटाच्या चार खासदारांनी मतदानावेळी उपस्थिती लावली नव्हती.


महिला आरक्षण विधेयकाला लोकसभेत उपस्थित राहता पाठिंबा न देण्याच्या कृतीवर खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.


शिंदे गटाची भूमिका काय? 


शिंदे गटाचे संसदेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, "ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या  विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयका विषयी मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल."


ही बातमी वाचा: