मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील कलगीतुरा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरणाऱ्या भाजपविरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.


निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरु नये, असा नियम आहे. मात्र भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरुन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे.

या प्रकरणी देसाईंनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे. तसंच भाजपविरोधात त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी अनिल देसाईंनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरुन याआधीच दोन्ही पक्षांमध्ये मोठे राजकारण पाहायला मिळाले होते. आता निवडणूक प्रचारात राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र वापरण्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु होण्याची शक्यता आहे.