पुणे : शिवसेना-भाजपमधील दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या खडाजंगीचा परिणाम पुण्यातील कार्यक्रमावरही होणार आहे. पुण्यात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये स्मार्टसिटीचा कार्यक्रम होत आहे. मात्र उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सुुरुवातीला मनसे या कार्यक्रमाला हजेरी लावणार होती. मात्र आता मनसेची यू टर्न घेतला आहे. कार्यक्रमाला जायचं की नाही, हे राज ठाकरेंशी बोलून ठरवू. मात्र कार्यक्रमाला जाण्याची आमची इच्छा नाही, असं मनसेतर्फे सांगण्यात आलं आहे.
तर कार्यक्रम पत्रिकेवर नाव नसल्याने पुण्याचे महापौर प्रशांत जगतापही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. प्रशांत जगताप पंतप्रधानांच स्वागत करायला विमानतळावर जातील. परंतु म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.