हेडलाईन्स:

1. काश्मीरच्या कुपवाड्यात दोन ठिकाणी भारतीय जवानांची दहशतवाद्यांशी चकमक, 6 दहशतवाद्यांचा खात्मा, दृगमुल्ला परिसरात गोळीबार सुरुच

------------------------------

2. मुंबईत रात्री पावसाची संततधार, गेल्या 24 तासात मुंबई शहरात 28.99 मिमी तर पश्चिम उपनगरात 44.72 मिमी पावसाची नोंद

------------------------------

3. पदाचा गैरवापर करुन वायकरांनी एसआरएचे प्रकल्प लाटले, सलग दुसऱ्या दिवशी गंभीर आरोपांची माळ, मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम

------------------------------

4. उद्धव ठाकरेंची शोलेतल्या असरानींशी तुलना करुन सेनेला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न, भंडारींच्या मनोगतमधील लेखानं खळबळ, वादानंतर भाजपनं हात झटकले

------------------------------

5. पाणी, मंदिर आणि स्मशानं सर्वांसाठी खुली करू, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, आरक्षण घेण्यात प्रामाणिकता नसल्याचाही दावा

------------------------------

6. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास बालिश बुद्धीनं, हायकोर्टानं तपास यंत्रणांना झापलं, पानसरेंचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास नकार

------------------------------

7. अहमदनगरमध्ये जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, शेजारच्या शेतातही शिरलं पाणी. नागरिकांनी पाण्याच्या फोर्समध्ये धुतल्या गाड्या

------------------------------

8. दोन तिहेरी हत्याकाडांनी मुंबई हादरली, मालवणी दोन नातवांसह आजीची हत्या, तर कल्याणमध्ये दरोड्याच्या उद्देशानं कुटुंबाला संपवलं

------------------------------

9. पुढच्या 1 वर्षासाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा अनिल कुंबळेकडे, बीसीसीआयची घोषणा, रवी शास्त्री यांची संधी हुकली

------------------------------

10. युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही यावर ब्रिटनवासियांचं मतदान, दुपारपर्यंत जनमत चाचणीचा निकाल येणार, जगाचं निकालकडे लक्ष