Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील विचारण्यात आले. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे आगामी काळात समजेल. ते सांगण्याची ही जागा नाही. आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग तो सांगू असे राऊत म्हणाले. सर्व निर्णय एकत्र बसून घेतले जातील. फार ओढाताण करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं आहे. कारण, महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचं असल्याचे राऊत म्हणाले.


राज्याला एक चेहरा द्यावा लागेल 


राज्याला एक चेहरा द्यावा लागेल असे राऊत म्हणाले. लोकसभेला राहुल गांधी यांचा चेहरा असता तर आणखी काही जागा जिंकता आल्या असत्या असंही राऊत म्हणाले. आज विरोधी पक्षाचा चेहरा राहुल गांधी हेच आहेत असंही राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे या देशात मोदी शाह यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा चेहरा बनले आहेत, असंही राऊत म्हणाले. 


तिन्ही पक्ष विधानसभेला एकत्र सामोरं जाणार


शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत होते. त्यांच दौरा हा भरगच्च होता. बहुतेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका काही दिवसांनी होत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर India आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलण्यासाठी ते आले होते. त्यांनी भेटी घेऊन चर्चा केल्याचे राऊत म्हणाले. या भेटीचं फलित इतकचं आहे की, आम्ही तिन्ही पक्ष विधानसभेला एकत्र सामोरं जात आहोत असे राऊत म्हणाले. 


16 ऑगस्टला तीन पक्षांचा मुंबईत एकत्र मेळावा


आमचं आघाडीत सगळ सुरुळीत सुरु असल्याचे राऊत म्हणाले. मुंबईत येत्या 16 तारखेला तीन पक्षांचा एकत्र मेळावा होणार आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात निवडणुकीच्या अनुषंगाने यावं असं आम्ही त्यांना विनंती केल्याचे राऊत म्हणाले. सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरव्याचं त्यांनी सांगितलं. 


अयोध्येत संरक्षण खात्याची 1300 एकर जमीन भाजपने कोणत्या उद्योगपतींच्या खिशात घातली? 


गौतम अदाणी या एका व्यक्तीला एवढा मोठा प्रकल्प कसा दिलं हा चर्चेचा विषय असल्याचे राऊत म्हणाले. टेंडरमधे ज्या गोष्टी नाहीत त्या त्यात घातलेल्या आहेत, त्याला विरोध असल्याचे राऊत म्हणाले. मुंबईचे 20 प्रमुख भूखंड तुम्हाला का हवे आहेत? असा सवाल राऊतांनी केला. अयोध्येत संरक्षण खात्याची 1300 एकर जमीन भाजपने कोणत्या उद्योगपतींच्या खिशात घातली? असा सवालही राऊतांनी केला. 
आमचे नेते दिल्लीत होते त्यामुळं आम्ही सभागृहात नव्हतो.


महत्वाच्या बातम्या:


Sanjay Raut: शिवसेना एकनाथ शिंदेंची म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, तुम्ही बाबासाहेबांचे वारस...