Omraje Nimbalkar on Ajit Pawar : तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री बनणं चांगलं आहे. हाच विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दबावात भाजपसोबत गेल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) केला. पंतप्रधानांच्या 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सोबत आलेल्या अजित दादांना भाजपनं अर्थ खात दिलं, कारण खायचं कसं हे त्यांना (अजित पवारांना) चांगलं माहित असल्याचा टोलाही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला.  धाराशिव जिल्ह्यात आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये ओमराजेंनी मुख्यमंत्र्यांसह आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.


तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनणं सोपं


अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुखा सुखी भाजपसोबत गेलेले नाहीत. तर दोघांवर दबाव आणून भाजपने आपल्या बाजूला केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील जेवळी गावात महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते. तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनणं सोपं आहे, असा विचार करुन दोघे भाजपसोबत गेल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्याच्या सहा दिवसातच अजित पवार भाजप सोबतच गेलेच नाही, तर भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री ही बनवलं. तसेच अर्थ खातंही दिलं. कारण खायचं कसं? हे त्यांना चांगलं माहीत होतं असा टोलाही ओमराजेंनी लगावला. जनतेला भाजपची ही वॉशिंग मशीन पटलेली नाही, जनता हिशोब करेल असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


पवनराजे हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे द्या, 2 महिन्यात निकाल लावा; ओमराजे निंबाळकरांचे गंभीर आरोप