मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) पुढची सुनावणी ही 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणाची कागदपत्रे ही 16 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहेत. दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर (Rahul Narvekar)  सुनावणी सुरु झाली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण 34 याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. 


आज सुरू असलेल्या या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी सुनावणीला उपस्थित आहेत. तर शिंदे गटाचे कुणीही उपस्थित नव्हतं. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये ई मेलवरच्या व्हिपवरून जोरदार युक्तिवाद झाल्याचं दिसून आलं. 


ई मेलवरून व्हिप पाठवल्याचा ठाकरे गटाचा दावा 


शिंदे गटाच्या 16 आमदारांना ई मेलच्या माध्यमातून व्हिप बजावण्यात आला होता असा दावा ठाकरे गटाने केला. त्या संबंधित त्यांनी पुरावेही सादर केले. पण ज्यावर व्हिप पाठवण्यात आले होते ते ई मेल आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. आपल्याला व्हिपच मिळाला नाही, त्यामुळे त्याचं उल्लंघन केलं असं होत नाही असं शिंदे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं


जर आम्ही व्हीप पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे ते त्यांनी सांगावं. आयटी कायद्यानुसार ईमेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांना स्पेशल ईमेल आयडी मिळाला आहे का? महेश शिंदे यांनी maheshshinde0003 असा मेल आयडी दिलाय. हा कुठला आयडी आहे? 


तुम्ही म्हणता ईमेल दिला आहे पण ते म्हणतात तसं चुकीच्या ईमेलला जर दिला असेल तर त्याला उत्तर काय असा सवाल राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना दिला. 


त्यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना सांगितलं की, जर आम्ही व्हिप पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे ते त्यांनी सांगावं.


ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद 


या प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. गेल्या सुनावणीत आपण अर्ज दाखल केला होता. जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत. त्याला माझा विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी. 


अध्यक्ष काय म्हणाले?


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतोय. 25 सप्टेंबर च्या निर्णयानुसार पुरावे सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल केले. पण अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर व्हिपसंदर्भात प्रश्न निर्माण केला. शिंदे गटाने मेल मिळालाच नाही असे सांगितले. गेल्यावेळी मी सांगितले होते की पुरावे सादर करावेत, पण अद्याप अर्जावर सुनावणी सुरु आहे. जर मी पुरावे सादर करू नका म्हटले तर मला सादर करण्यास मिळणार नाहीत. याउलट त्यांना परवानगी मिळू शकते. 


ठाकरे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद


विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटाच्या सहमतीने पुरावे सादर करण्यास परवानगी देत आहे. तसेच फेरसाक्ष घेण्याचा निर्णय घेत आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून सहमती आहे. अर्ज मंजुरी काढण्यात येत आहे. वेळेची बचत करण्यासाठी दोन्ही गटांची मंजुरी आहे. 


ही बातमी वाचा: