Sanjay Raut : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे. राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील लोकांचा वापर करत असल्याचे राऊत म्हणाले. 


फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीनं राजकारणाचा दर्जा खाली आणला


तरुंगात सरकारचे प्रतिनिधी जात असल्याचे राऊत म्हणाले. जेलमध्ये असलेल्या आरोपीच्या एका वक्तव्याला एवढं महत्व का? असेही राऊत म्हणाले. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीनं किती खाली आणला आहे हे दिसत असल्याचे राऊत म्हणाले. याला फडणवीस पाठबळ देत असल्याचे राऊत म्हणाले.   


भाजपच्या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करा


भाजपच्या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करा, मग तुम्हाला कळेल गेल्या 10 वर्षात या लोकांनी काय कांड केलं आहे असं राऊत म्हणाले. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, अरविंद केजरीवाल यांना ईडीचा सीबीआयचा गैरवापर करुन अडकवण्यात आलं. मुंबईचे पोलीस आयुक्त हे मुख्य आरोपी आहेत, त्यांना मोकळं सोडण्यात आल्याचे राऊत म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटीक्स केलं


देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटीक्स केलं असल्याचे राऊत म्हणाले. गृहमंत्री म्हणून फडणवीस सध्या आरोपीच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवत आहेत. स्वत:फडणवीस वकिल आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिसस्करा करत असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस हेच या राजकारणाचे सुत्रधार असल्याचे राऊत म्हणाले. कधीकाळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आमच्या जवळचे होते. अमित शाह हे देखील जवळचे होते. 
पंतप्रधान मोदी हे देखील जवळचे होते. पण आज हे काय करतात ते महत्वाचे असल्याचे राऊत म्हणाले. 


भाजप अशा प्रवक्त्यांमुळं रसातळाला जाणार 


दहशतवादाच्या आरोपातील एक गुंड, जो बॉम्ब बनवतो, ज्याला पोलीस आयुक्त मदत करतात, तो हत्येतला आरोपी आहे. हा आरोपी भाजप संकटात असला की बाहेर येऊन स्टेटमेंट देत असल्याचे राऊत म्हणाले. भाजप अशा प्रवक्त्यांमुळं रसातळाला जाणार असल्याचे राऊत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


फडणवीसांनींच वाझेंकडून पत्र लिहून घेतलंय, लोकांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न, सुषमा अंधारेचा थेट आरोप