Shivsena Leader Eknath Shinde : राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 


विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे तब्बल 35 आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. एबीपी माझाच्या हाती त्यापैकी काही आमदारांची नावं लागली आहे. 


एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार? एबीपी माझाच्या हाती यादी 


मुंबई


1. मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे


मराठवाडा 


1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर


कोकण 
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले


पश्चिम महाराष्ट्र 
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे


ठाणे  
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर


उत्तर महाराष्ट्र  
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील


विदर्भ 
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड


एकनाथ शिंदे आणि आमदार सूरतला पोहोचले कसे, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम 


काल संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदेंसब सर्व आमदारांनी प्लानिंग करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतून सूरतला जाणाऱ्या फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं. त्यासोबतच, एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं. सर्वात आधी 11 विधेयक रात्री वाजेपर्यंत सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचले. त्यापाठोपाठ दीड वाजता एकनाथ शिंदेंसह आणखी काही आमदार हॉटेलमध्ये पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंसोबत 25 ते 30 शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. स्थानिक भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मदत केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. 


सूरतमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना मदत केली. त्यासोबत सूरत पोलिसांनी रात्री याप्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर सकाळी 5 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली. 


कनाथ शिंदे घेणार टोकाची भूमिका?


गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती  आहे. रात्रीच्या सुमारास 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :