मुंबई : लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी इतर मंत्र्यांचेही शपथविधी होतील.


एनडीएतील सेकंड लार्जेस्ट पार्टी (एनडीएतील सर्वाधिक खासदार असलेला दुसरा पक्ष) असलेल्या शिवसेनेला आता दोन कॅबिनेट मंत्रीपदं आणि एका राज्यमंत्रीपदाची आशा आहे. 2014 मध्ये शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. परंतु यावेळी तीन मंत्रीपदं मिळतील अशी शिवसेनेतील नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी लॉबिंग सुरु केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून कोणाला मंत्रीपद दिले जाणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सध्या दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी हे तिघेजण मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु आहे.

व्हिडीओ पाहा



वाचा : शिवसेनेचे 'हे' दिग्गज नेते पराभूत