मुंबई : लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यासोबत राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा जिंकता आली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसनेचे 18 उमेदवार निवडून आले होते. यंदाही शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले असले तरी हा आकडा वाढला असता, परंतु शिवसेनेच्या चार विद्यमान खासदारांना पराभूत व्हावे लागले असल्यामुळे शिवसेनेच्या खासदारांची संख्या होती तितकीच राहिली आहे.
विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आणि औरंगाबादचे गेल्या दोन दशकांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे हे चार दिग्गज नेते निवडणूकीत पराभूत झाले आहेत.
शिवसेनेने शिरुर, अमरावती, रायगड आणि औरंगाबाद हे मतदारसंघ गमावले आहेत. तर हातकणंगले, कोल्हापूर, पालघर आणि हिंगोली या चार जागा जिंकल्या आहेत.
औरंगाबादमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झाला आहे. औरंगाबादसह सेनेने शिरुरही गमावले आहे. शिरुरमध्ये सेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला आहे.
रायगडमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आले नाही. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी बाजी मारली. अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा यांनी कडवी झुंज देत शिवसेनेकडून हा मतदारसंघदेखील हिरावला आहे.
शिवसेनेचे 'हे' दिग्गज नेते पराभूत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 May 2019 09:55 AM (IST)
लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले आहे.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -