विधानसभेत आक्रमक झालेले शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला. या प्रकरणावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला झाला.
अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची आहे. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे : पंकजा मुंडे
दुसरीकडे, जोपर्यंत मेस्मा हटवत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज होऊ न देण्याची भूमिका शिवसेनेने विधानपरिषदेत घेतली. ज्या अंगणवाडी सेविकेमुळे कुपोषण कमी झालं, तिला का आंदोलन करावं लागतं, मेस्मा जबरदस्ती आहे, असं विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला.