Ambadas Danve Speech : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve Live) यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून (Shivsena Dasara Melava live) सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, पिक विमा, नांदेड रुग्णालयातील प्रकारावरुन अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला. दानवे यांनी आजच्या भाषणातून सरकारवर टीकास्त्र सोडले. त्याशिवाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या विकासाबद्दल सांगितले. अंबादास दानवे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पाहूयात...
अंबादास दानवे यांच्या भाषणातील मोठे मुद्दे
दसरा मेळावा एकच आणि तो शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचाच होय. दसरा मेळावा गद्दांरांचा नाही. दसरा मेळावा मर्दांचाच होतो. तुम्ही दिल्लीची चाकरी करावी, तुम्ही लवकरच घरी बसाल, कार्यकाळा पूर्ण होण्याआधी घरी बसण्याची वेळ येणार आहे.
तुम्ही शेतक-यांसाठी काय केलं. ज्यावेळी या जमिनीवर पाप होत असतं त्यावेळी निसर्ग देखील कोपतो. विमा कंपन्यांची खळगी भरण्याचा डाव आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांच्या पिक विम्याचे गाजर आहे... विमा कंपन्यांचे खिशे भरण्यासाठी योजना आहे का?
महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवू
येणारा काळ आपला आहे, लढा द्यायचाय.
शासन आपल्या दारी पण खरंतर या सरकारकडून मृत्यू घरोघरी असे सुरु आहे.
उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली होतील.
नोकरभरतीच्या शुल्कातून कोट्यावधी रुपये जमा केले, मात्र एकाही बेरोजगाराला नोकरी मिळालेली नाही.
आपल्या दवाखाना अशी जाहिरात करतात, मात्र सर्व दवाखाने भांडवलदारांचे झाले आहेत.
हे म्हणतात शासन आपल्या दारी मात्र, सरकार पाठवतंय मृत्यूच्या दारी, अशी आरोग्याची समस्या आहे.
नको गुलामी भक्षकाची, नको गुलामी म्हैशासुरांची... आता वेळ आहे, वाघाच्या डरकाळीची आहे. आता लढाई आमच्या शेतकऱ्यांसाठी... आमच्या माय भगिनींसाठी आम्हीच वादळ आम्हीच तुफान... आम्हीच आग... आम्हीच भींत... छाटू तुमचे गद्दारांचे पंख... जोवर होत नाही तुमचा अंत...
आणखी वाचा :
फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, दादा भुसे गोट्या खेळतात का? सुषमा अंधारेंच्या भाषणातील ठळक मुद्दे