Shivsena Dasara Melava 2022 : जिल्हा प्रमुख आजारी पडला होता, कुठल्याही क्षणी जाणार होता, त्यावेळी मी नुसता शिंदे साहेबाना फोन केला, आपला जिल्हाप्रमुख नाही राहिला. ज्यां 35 वर्ष शिवसेनेत घातले, पण त्याला वाचवू शकलो नाही. पुढच्या पंधरा मिनिटांत एअर अंबुलन्स उपलब्ध करून दिली. मग तुम्हाला रात्रंदिवस शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहणारा मुख्यमंत्री पाहिजे की, घरात बसणारा पाहिजे असा उद्विग्न सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
मंत्री गुलाबराव पाटील बिकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी अनेकांची खरड पट्टी काढतांना उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र ज्यावेळी गुलाबराव पाटलांनी हा प्रसंग सांगितला. त्यावेळी व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
गुलाबराव पाटलांच्या भाषणाची सुरवात 35 वर्षांपूर्वी दसरा मेळाव्याला कसा येत होतो इथून झाली. 35 वर्षांपासून दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर जाणारा मी एक शिवसैनिक आहे, सकाळी ट्रेन मध्ये बसायचं जिथे जागा मिळेल तिथं बसायचं, गळ्यामध्ये भगवा फटका घालायचा, वंदनीय बाळासाहेब जिंदाबाद म्हणत निघायचं. सकाळी दादर ला उतरताच पाच रुपयांत अंघोळ करायची. दिवसभर गेट ऑफ इंडिया फिरायचं. चार वाजता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची वाट बघत बसायचं. त्यानंतर बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी कान आतुर होत असे. 1966 ला ज्यावेळी मुंबईत शिवसेना आली. शिवसेना म्हणजे काय तर शि म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी ना म्हणजे जिथं नामर्दाना स्थान नाही अशी शिवसेना होय, असा अर्थही पाटलांनी यावेळी सांगितला.
मंत्री पाटील पुढे म्हणाले मी तसा पान ठेला चालविणारा शिवसैनिक मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालो. शिवसैनिक झाल्यावर पहिल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी मला आत टाकलं. तेथून खऱ्या अर्थाने सुरवात झाली. माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला बाळासाहेब ठाकरे यांनी. मंत्री केलं. गेल्या अनेक वर्षांपासून गावचा दसरा पाहिला नाही, आज आमच्यावर आरोप केले जात आहेत. शिवसेने करता काय केले शिवसेनेच्या विचारांना पुढे न्यायचं असेल तर एक नाथ शिंदेंना साथ दिल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
मंत्री पाटलांची शायरी
यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी आपली शायरीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भाषणाच्या सुरवातीपासूनच त्यांनी अनेक शायरीच्या माध्यमातून ठाकरेंवर ताशेरे ओढले. 'जब चमन को लहू की जरूरत पडी, तो सबसे पहिले गर्दन हमारी कटी,अब पहिले चमन कहते है , अब चमन हमारा हे तुम्हारा नहीं', बात होती कुलोतक तो सह लेते हम पर अब कहते है की काटो पर बी तुमहारा हक नहीं', 'कापल्या जरी आमच्या कितीही नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी आमची छाती त्यावर दिसेल मूर्ती बाळासाहेबांची', बाळासाहेब ठाकरे जी ने तिर कमान से छोडा
पापी लोगोंका कमर तोडा, मुंबई नगरी मे बैठे थे हिंदू राजा, अब ईबादत करणी है तो शिवसेना मे आजा, इस देश मे रेहना होगा तो वंदे मातरम केहना होगा...अशा विविध शयरींनी त्यांनी दसरा मेळाव्याचे व्यासपीठ गाजविले.
हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आमची नाव असणारं
माझं वय 35 त्याच वय 32 मग कुणावर बोलताय हे पाहिलं पाहिजे, मी शिवसेनेत होतो, तेव्हा ते जन्माला आले नव्हते. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी सोन्यासारखा माणसाला गमवलं.
आम्ही तुमचे वारसदार नाहीत, मात्र हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर चाळीस आमदाराची नावे आहेत. शिवसेनेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, त्यावेळी चाळीस वारसदारांमध्ये इतर हक्कामध्ये गुलाबराव रघुनाथ पाटील हे नाव लिहल जाईल. तर ठाकरेंचे नाव लिहल जाईल 'काँग्रेस पुरस्कृत राष्ट्रवादी 1008 महामंडलेश्वर श्री श्री शरद पवार यांचे अनुयायी आदरणीय उद्धवजी ठाकरे आ रहे हें...अस होईल असं गुलाबराव पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री संवेदनशील माणूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबात वाईट प्रसंग आला, त्यांनी राजकारण सोडलं, ठाण बांधल. त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले.
हा माणूस संवेदनशील आहे. सत्ता बदलानंतर 33 देशाने दखल घेतली, आतापर्यंत राजकरणात ज्या ज्या नेते बंडखोरी करून बाहेर पडले त्यांच्याबरोबर कुणीही नव्हते, मात्र शिंदे सोबत चाळीस आमदार, 10 अपक्ष आमदार, 12 खासदार होते. बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे निघाले आहेत, म्हणून त्यांना साथ देत आहोत. हात दाखवा अन गाडी थांबवा अस आमचा मुख्यमंत्री आहे.