मुंबई: युतीत गेल्या काही दिवसांपासून पोस्टर, वर्तमानपत्रांतून सुरु असलेल्या वादानंतर आता हा वाद रस्त्यावर उतरला आहे. शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.

 

मुंबईजवळच्या बोरीवलीमध्ये आज भगवती हॉस्पिटलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता. यावेळी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, तर महापौर स्न्नेहल आंबेकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे देखील उपस्थित होते.

 

यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमल्यामुळे धुसफूस सुरु झाली. मात्र ही धुसफूस वाढत जाऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.  दोन्हीही कार्यकर्ते अक्षरश: इरेला पेटले होते.

 

दुसरीकडे कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी सुरु असताना, दोन्ही पक्षातील नेत्यांनी सामंज्यशाची भूमिका घेणं आवश्यक होतं, मात्र उलट त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहनच दिल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेना- भाजप वाद

 

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.

 

मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली. ‘राऊत साहेब तलाक केव्हा घेताय’, असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली.

यानंतर शिवसेनेने ठिकठिकाणी माधव भंडारी आणि भाजपचा निषेध नोंदवत आंदोलन केलं.



संबंधित बातम्या

..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना


'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?'


सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं, राष्ट्रवादी निवडणुकांसाठी तयार: आव्हाड


तुमच्या वृत्तपत्राच्या जाळपोळीस तयार रहा, शेलारांचा इशारा


'सामना जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण', सेनेचं टीकास्त्र