बीड : पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलण्यासाठी 25 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री मेटेंना भेटणार आहेत. याप्रकरणी 25 तारखेपर्यंत तोडगा काढण्याचा अल्टिमेटम मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
याबाबत मेटे म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही माहायुतीमध्ये आलो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याचे मेटे यांनी सांगितले. त्यामुळे 25 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. त्यावेळी यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही जिल्हा परिषदेतील सत्तेतून बाहेर पडू.
मुख्यमंत्र्यांच्या माध्यस्तीनंतर आम्ही भाजपसोबत एकत्र लढलो. सत्तादेखील काबीज केली. परंतु त्यानंतर आम्हाला केवळ एक उपाध्यक्षपद देऊन आमचा व संघटनेचा विश्वासघात झाला. तसेच निवडून आल्यानंतर आम्ही आणलेल्या कामात खोडा घातला जात आहे. आमची माणसे भाजपने फोडली. त्यामुळे आम्ही लवकरच जिल्हा परिषेदेच्या सत्तेतून बाहेर पडणार आहोत.
बीड जिल्हा परिषदेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या विनायक मेटे यांनी मात्र भाजपपासून वेगळे होणार का? हे सांगणे सोयीस्करपणे टाळले. महायुतीमध्ये सत्तेत असतानाही मागच्या चार वर्षांमध्ये मेटेंना भाजपने मंत्रीपद दिले नसल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची नाराजी याआधी अनेक वेळा समोर आली आहे.
विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2018 07:27 PM (IST)
पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -