सांगली : शिवजयंतीचं औचित्य साधून सांगलीत तब्बल सव्वा लाख चौरस फुटावर पसरलेली शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील 100 कलाशिक्षकांनी मिळून शिवरायांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी चार दिवसांच्या मेहनतीने ही महारांगोळी साकरली.

विशेष म्हणजे लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम साकारण्यात आला आहे. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ही राज्याभिषेकाची रांगोळी साकारण्यात आली.



या विक्रमी रांगोळीसाठी गिनीज बुक, लिम्का बुक, एशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक अशा नऊ ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी, नागराज मंजुळेची खास उपस्थिती

 

तब्बल शंभर तास कष्ट घेऊन कलाकारांनी ही रांगोळी काल (सोमवारी) रात्री रेखाटून पूर्ण केली. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रेक्षकांना ही महारांगोळी पाहता येणार आहे.
देशभरात शिवजयंतीचा उत्साह, राहुल गांधींचं मराठीतून ट्वीट, शिवरायांना अभिवादन

पाहा व्हिडिओ :