काय आहे प्रकरण?
मागील वर्षी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमने एका कामाबाबत पीडब्लूडीचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवरायांविषयी अवमानकारक भाष्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला हद्दपार करण्यात आलं होतं.
16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली. छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटलं होतं.
महापालिका निवडणुकीत विजय
अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या श्रीपाद छिंदमने दोन हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. ज्या भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली, त्याच पक्षाचा उमेदवार प्रदीप परदेशीचा त्याने पराभव केला. त्यामुळे छिंदमने सर्व मतदारांचे आभारही मानले.
माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजपमधून बाहेर काढल्यानंतर त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला.
संबंधित बातम्या
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम शिवरायांसमोरच नतमस्तक
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी
श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी अहमदनगरमधून तडीपार
छिंदम हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आलाच नाही!