शिवराज्याभिषेक दिन सोहळा... रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 10:40 AM (IST)
रायगड : किल्ले रायगडावर आज 344 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या सोहळ्याला खासदार संभाजी राजे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. किल्ले रायगडावर सकाळपासून हजारो शिवभक्तांनी गर्दी करत 'जय भवानी... जय शिवाजी'चा गजर सुरु केला. या सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून सोहळ्याची सुरुवात झाली. खासदार संभाजी राजे यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. आज संध्याकाळी 4 वाजता शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले आहे.