मुलाला पाण्यात बुडवून नागपुरात आईची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 08:00 AM (IST)
नागपूर : नागपूरमध्ये एका महिलेनं आपल्या लहान मुलाला पाण्यात बुडवून त्याची हत्या केली आहे. मुलाला मारल्यानंतर महिलेनं आत्महत्या केली आहे. नागपूरच्या जरीपटका भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमध्ये जरीपटका भागात राहणाऱ्या लक्ष्मी शर्मा या महिलेनं आपल्या 9 वर्षीय मुलाला पाण्यात बुडवून मारलं आणि त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. मायलेकाच्या मृत्यूमुळे नागपूरच्या जरीपटका भागात खळबळ उडाली आहे. दरम्यान महिलेनं असं का केलं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. काल संध्याकाळी उशिरा ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.