शिवनेरी, पुणे : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा पाळणा जोजवला गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील यावेळी हजर होत्या.
मुख्यमंत्री शिवनेरीवर आले आणि शिवजन्माचा पाळणा जोजवला. मात्र त्यानंतर किल्ल्यावर दरवर्षी होणारी सभा मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. काहीही न बोलता मुख्यमंत्री निघून गेले. दरवर्षी पळणा जोजवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर किल्ल्यावर सभा होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री काही न बोलताच गेले.
विनोद तावडे आणि पंकजा मुंडे कार्यक्रमाला थांबले. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री 8.55 वाजता किल्ल्यावर येणार होते आणि 10.05 वाजता परत जाणार होते. मात्र 9.35 वाजताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने शिवनेरीवरुन उड्डाण घेतलं.
मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्रचा कार्यक्रम सुरु आहे. तिथे उपस्थित रहायचं असल्यामुळे मुख्यमंत्री लवकर गेले, असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी नंतर दिलं.
दरम्यान, गडदुर्ग संवर्धन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने सुरुवातीला 14 गडांची संवर्धनासाठी निवड केली असून त्यावर काम सुरु आहे. अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी गडांचं काम हाती घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
19 Feb 2018 11:39 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील यावेळी हजर होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -