Shivendraraje Bhosale on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. फडणवीस यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं आहे, हिमालयासारखे नेते फडणवीस आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे यांनी फडणवीस यांचे कौतुके केले.
ओबीसी मुलांचा विकास देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आहे म्हणून झाला
शिवेंद्रराजे म्हणाले की, राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती व्हावी अशी मागणी होत होती. समाजाला दाबून ठेवण्याचे काम केले गेलं. समजून घेणारा नेता आला आणि जयंती आता साजरी होत आहे. देशात ज्यांनी अनेक वर्ष राज्य चालवले त्यांना जे जमले नाही ते मोदी यांनी केले. दिल्लीत शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे मोदी पंतप्रधान झाल्यावर बांधले गेले. उमाजी नाईक यांची जयंती देवेद्र फडणवीस यांनी सुरू केली. ओबीसी मुलांचा विकास देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आहे म्हणून झाला आहे. त्यांनी सांगितले की, फडणवीस यांना प्रश्नांची जाण आहे म्हणून थोपटे यांच्या कारखान्यांना 420 कोटी रुपये कर्ज दिले.
ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला
त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय पोळी भाजण्याची काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी हे काम केले. मला मंत्री केलं. आता माझ्या विभागाच्या वतीने इथ काम करता आले. त्याबद्ल बरं वाटले. स्मारक लवकरच होईल. रामोशी समाज आणि छत्रपती यांचे काही तरी काम करण्याचे संधी मिळाली. आपण आपल्या माणसाला मोठे केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या