Shivaji University Senate Election 2022 :शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी शुक्रवार पर्यंत एकूण 501 अर्ज दाखल झाले. पदवीधर 164 जागांसह सिनेटसाठी सर्वाधिक 290, विद्या परिषदेसाठी 27 आणि 36 अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन जागांसाठी 184 दाखल झाले आहेत. 


दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी 31 ऑक्टोबरला तर अर्ज माघारीसाठी 1 नोव्हेंबरची अंतिम मुदत आहे. 14 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.  सिनेटच्या 39 प्रतिनिधींसाठी 290 अर्ज आहेत. संस्था प्रतिनिधींच्या खुल्या गटातील 4 जागांसाठी 22 महिला वर्गासाठी तीन प्राचार्य प्रतिनिधीच्या खुल्या गटातील 5 जागांसाठी 9 महिलांसाठी 1 अनुसूचित जातीसाठी 3 भटक्या व विमुक्त जमातीसाठी 1 इतर मागासवर्गासाठी 3 असे 10 जागांसाठी 17 अर्ज दाखल झाले आहेत.


महाविद्यालय शिक्षक प्रतिनिधीच्या खुल्या गटात 5 जागांसाठी 27, महिला गटासाठी 3 अनुसूचित जातीसाठी 15 अनुसूचित जमातीसाठी, 3 भटक्या व विमुक्तसाठी 8 इतर मागासवर्ग गटात 3 अशा 10 जागांसाठी 59 अर्ज झाले आहेत. 


पदवीधरसाठी खुल्या गटातील 5 जागांसाठी 91, महिला गटासाठी 18 अनुसूचित जाती 15 अनुसूचित जमातीसाठी 5 भटक्या व विमुक्त जमातीसाठी 19 इतर मागासवर्गासाठी 16 असे 10 जागांसाठी 164 अर्ज  आले आहेत. विद्यापीठ शिक्षक प्रतिनिधीच्या खुल्या गटात 11 महिला गटात 8 अनुसूचित जमातीसाठी 6 अशा तीन जागांसाठी 25 अर्ज आले आहेत.
विद्या परिषद शिक्षक प्रतिनिधीच्या 8 जागांसाठी 27 अर्ज आले आहेत. विद्या व विज्ञान व तंत्रज्ञांच्या खुल्या जागेसाठी 5 अनुसूचित जमातीसाठी 2 वाणिज्य व्यवस्थापनच्या खुल्या महिला गटासाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत. 


वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पॅनेल करून लढणार 


शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित स्वतंत्र पॅनेल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ‘वंचित बहुजन विद्यार्थी विकास आघाडी’ असे या पॅनेलचे नाव असेल.


सिनेट निवडणुकीसाठी शिव शाहू आघाडी


दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना, ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ़ इंडिया या संघटनांचा समावेश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या