Yavatmal Washim वाशिमदेशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election)आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने देखील आपली कंबर कसली असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या दौरा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात करण्याचे सुनिश्चित केले आहे. उद्धव ठाकरे 12 आणि 13 मार्चला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि संवाद मेळाव्यातून पक्षाला बळकटी देणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षात उभी फुट पडल्या नंतर शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा हा मतदार संघ असून या चारही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये नेमके काय भाष्य करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


बैठका आणि संवाद मेळाव्यातून ‘मोर्चे’ बांधणी!


मिशन लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन ठाकरे गट निवडणुकीच्या कामाला लागले आहे. अशात स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करून पक्षाची ‘मोर्चे’ बांधणी करत आहे. दरम्यान, 12 आणि 13 मार्चला स्वतः उद्धव ठाकरे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पदाधिकारी बैठक आणि संवाद मेळावे घेण्यासाठी येणार आहे. 12 मार्चला राळेगाव येथे दुपारी 12 वाजता, तर पुसद येथे सायंकाळी 6 वाजता ते संवाद मेळावा घेणार आहे. त्यांनंतर ते माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या घरी मुक्कामी असणार आहे. तसेच 13 मार्चला उद्धव ठाकरे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे 12 वाजता, तर सायंकाळी 6 वाजता वाशिम शहरात मेळावा घेणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संजय देशमुख यांची उमेदवारी जवळ जवळ निश्चित मानली जात असतांना, या सभेतून अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


पंतप्रधान, मुख्यमंत्री पाठोपाठ उद्धव ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यात


गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनंतर 4 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वाशिमला भेट देत  (Washim) स्थानिक खासदार भावना गवळी यांच्या पुढाकाराने शहरात होत असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतील 84 आजी-माजी सरपंच, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य आणी जिल्हा परिषद सदस्य उबाठा गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक राजकारणात उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने देखील आपली कंबर कसली असून स्वतः उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरून आपली जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :