Dhule News Update : जागतिक जी 20 परिषदेच्या ( G 20 Summit ) अंतर्गत होत असलेली युवा परिषद 2023 चे आयोजन शनिवारी पुण्यात करण्यात आले. या युवा परिषदेत सहभागी होण्यासाठी युवा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातर्फे धुळ्याचे सुपूत्र क्षितिज किरण साळुंके यांची निवड करण्यात आली होती.
जी-20 परिषदेचा (G20 Conference) बहुमान यावेळी भारताला मिळाला असून, देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-20 च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहेत. विविध देशांच्या प्रतिनिधी मंडळांचे चर्चासत्र देशातील प्रमुख शहरात आयोजित करण्यात येत आहेत. यातील सर्वात महत्वपूर्ण चर्चासत्र म्हणजे युवा परिषद 2023 ही आहे. भारत सरकारच्या वतीने युवा मंत्रालयाच्या अंतर्गत जी 20 युवा परिषद 2023 ( वाय 20 ) चे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक 11 मार्च 2023 रोजी पुण्यात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून केवळ 5 तरुणांचे नामांकन करण्यात आले होते, ज्यात धुळे शहराचे सुपुत्र क्षितिज किरण साळुंके यांच्या नावाचा महत्वपूर्ण समावेश करण्यात आला होता. क्षितिज साळुंके याच्या या निवडीमुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जागतिक पटलावर धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राला हा बहुमान मिळणं धुळे जिल्ह्यासाठी व तमाम खान्देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याच्या भावना धुळ्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. परिषदेला संबोधित करत असतांना ग्रामीण भारतातील तरुणाईच्या समस्या, ग्रामीण अर्थव्यवस्था व रोजगाराची संधी आणि शाश्वत आधुनिक उद्योग विकास यावर क्षितिज किरण साळुंके यांनी आपले मत मांडले. क्षितिज साळुंके हे मेकॅनिकल अभियंता असून शहरातील आघाडीचे युवा संघटन धुळे युथ क्लबचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय युवा संसद 2023 चे जिल्हा विजेते देखील आहेत.
दरम्यान, 19 जानेवारी दरम्यान पुण्यात दोन दिवस जी-20 परिषद (Pune G-20) पार पडली. यानिमित्तानं संपूर्ण शहराला उत्सवाचं रुप आलं होतं. या परिषदेसाठी सरकारकडून मोठा तामझाम करण्यात आला होता. पुण्यातील चौकाचौकांचं सुशोभिकरण करण्यात आलं होतं. परदेशी पाहुण्यांच्या प्रत्येक गोष्टींची बारकाईनं काळजी घेतली गेली. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे विद्यापीठात या पाहुण्यांनी महाराष्ट्रातील संस्कृती कशी आहे? यासंदर्भात माहिती घेतली आणि लेझीमवर ठेकाही धरला, मात्र या जी-20परिषदेतून पुण्यातील पायाभूत सुविधांबाबत ठोस आराखडासमोर आला नाही.
महत्वाच्या बातम्या