Shiv Sena Thackeray group symbol News : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) सुधारित मशाल निवडणूक चिन्ह (symbol ) देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत मशाल हे निवडणूक चिन्ह आईस्क्रीम कोनसारखे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सांगण्यात आले होते. आता मात्र, मशाल स्पष्टपणे दिसण्यासाठी चिन्हात थोडा बदल करण्यात आला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नसल्याची माहिती ठाकरे गटाच्या वकिलांनी दिली आहे.


मशाल चिन्हांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही


शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नसल्याची माहिती ठाकरे गटाच्या वकिलांनी दिली आहे. लोकसभेला ते चिन्ह होतं तशाच प्रकारचे मशालीच या विधानसभा निवडणुकीला चिन्ह आहे. चित्र काढून दिलेलं मशालीच चिन्ह मिळावं यासाठी  निवडणूक आयोगाकडे याआधी ठाकरे गटांना विनंती केली होती. मात्र अजूनही चिन्ह मिळाले नसल्याची माहिती ठाकरे गटाच्या वकिलांनी केली आहे. 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला मिळालं होतं मशाल चिन्ह


शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना शिंदे गटाला मिळालं होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन चिन्ह देण्यात आली होती. त्यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल ही चिन्ह देण्यात आली होती. ठाकरे गटानं दिलेल्या तिसऱ्या स्थानावर असलेलं चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं. मशाल हे चिन्ह यापूर्वी एका राजकीय पक्षाकडे होतं मात्र त्या पक्षाचा जनाधार कमी झाल्यानं ते चिन्ह खुलं झालं होतं. ते उद्धव ठाकरे यांना मिळालं होतं.


दरम्यान, राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत. इच्छुकांनी गठी भेटी सुरु केल्या आहेत. तिकीट मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधाऱ्यांची महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. ही निवडणूक अनेक मुद्यांनी गाजणार आहे. अनिक ठिकाणी तुल्यबळ लढती होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला मतादन प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यानंतर राज्याचे नवे कारभारी कोण हे ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Uddhav Thackray : धनुष्यबाण ते मशाल हे स्थित्यंतर कसं होतं? उद्धव ठाकरेंनी नेमकं कुणाला जबाबदार धरलं, म्हणाले निवडणूक आयोग त्यांचा...