Madha Vidhansabha Election : माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्याकडून बंधू रणजितसिंह मोहिते पाटील ( Ranjitsinh Mohite Patil) यांना उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु आहे. आज दुपारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. यावेळी भेटीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील देखील आले होते, मात्र, माध्यमांच्या भीतीमुळे भेट न घेताच रणजितसिंह मोहिते पाटीलहे निघून गेले.


अभिजीत पाटील हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी 


दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीत तुतारीची साथ सोडून भाजपला मदत करणारे अभिजीत पाटील यांची सत्तत्यानं शरद पवारांची भेट घेणं सुरु आहे. आज अभिजित पाटील यांनी थेट शरद पवारांच्या गाडीत बसण्यासाठी स्थान मिळवत उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू ठेवल्याचं पाहिला मिळालं. तसेच माढा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे देखील पुत्र रणजित शिंदे यांना तुतारीकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेकदा शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे. त्याचबरोबर माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे या देखील पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, शरद पवार उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


उमेश पाटील पुन्हा शरद पवारांच्या भेटीला


माढ्याबरोबरच मोहोळ विधानसभा मतदारसंघाची देखील सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. अशातच उमेश पाटील यांनी देखील आज शरद पवार यांची भेट घेतली. मोहोळ मतदारसंघाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली आहे. अजित दादा अपसे बैर नहीं राजन पाटील तुम्हारी खैर नहीं हीच आमची भूमिका असल्याचे उमेश पाटील म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अजूनही तो स्वीकारला गेला नाही. आता याला 1 महिना झाला आहे. राजन पाटील म्हणाले होते की, आम्ही खानदानी पाटील आहोत. त्यामुळे मला लफडे करण्याचा अधिकार आहे. याला पक्षात ठेवलं आहे. पक्ष स्तरावर त्यांना पक्षात ठेवलं आहे याबाबत माझी नाराजी आहे. मी वरिष्ठाबाबत काहीही बोलणार नाही असेही उमेश पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग