Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केलं आहे. सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरांमध्ये राहावं, असा सल्ला देखीव म्हस्के यांनी दानवेंना दिला आहे. अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत अस सूचक वक्तव्य देखील नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाची ऑफर स्वीकारणार का?
दरम्यान, नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत अस सूचक वक्तव्य म्हस्के यांनी केलं आहे. त्यामुळं आता अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. षिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला सोडून सर्वजण महायुतीमध्ये येत आहेत असेनरेश म्हस्के म्हणाले. त्यामुळं अंबादास दानवे आणि सुरक्षित घर स्वीकारावं असेही म्हस्के म्हणाले.
काँग्रेसच्या नादी लागून उद्धव ठाकरेंचा कडेलोट झालाय
विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत. निवडणूक धोरणाला काँग्रेसने विरोध केला. त्यामुळं काँग्रेसचं दुटप्पी धोरण आहे. उद्धव ठाकरेंनी यातून दिशा घ्यावी. काँग्रेसच्या नादी लागून आपला कडेलोट झाला आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे एकही कुठलाही पुरावा सादर केला नाही. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पुरावे मागितले होते असेही म्हस्के म्हणाले.
ज्या ठिकाणी एकमत झालं नाही, त्या ठिकाणी वेगवेगळे लढू आणि पुन्हा एकत्र येऊ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात देखील नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेत असतात. महाराष्ट्रामध्ये महायुती 100 टक्के आहे. ही महायुती कायम राहणार असल्याचं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ज्या ज्या ठिकाणी जर एक मत झालं नाही, त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि पुन्हा एकत्र येऊ. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीची सत्ता हे कायम राहणार आहे. नंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या: