Continues below advertisement


मुंबई : बिहार विधानसभा (Bihar vidhansabha) निवडणुकांच्या निकालात भाजप एनडीएने मोठा विजय मिळवला असून भाजपच (BJP) मोठा भाऊ ठरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजप, जयदू, एलजेपी, एचएएम आणि आरएलएम या 5 पक्षांची एनडीए आघाडी होती. एनडीएमधील सर्वच पक्षांना गत 2020 च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील 243 जागांपैकी यंदा भाजप आणि जदयूने (JDU) 102 जागांवर उमेदवार मैदानात उतरवले होते. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्तीने 29 उमेदवारांना तिकीट दिले. तसेच, हिंदुस्तानी आवाम मोर्चाने 6 आणि आरएलएमने 4 उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये, एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचे दिसते. त्यामध्ये, भाजप 91 तर नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या जदयूला 79 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते.


बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- (Bihar Total Voting) बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे. 


बिहार विधानसभा निवडणुकांध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत एनडीए आघाडीला मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, भाजप आणि नितीश कुमार यांच्या राजद पक्षाने विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तर, काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या राजदमध्ये पराभवाचा लवलेश दिसून येत आहे. काँग्रेस महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 143 जागा लढवल्या तर काँग्रेसने 60, सीपीआय माले-20, व्हिआयपी 11, सीपीआय 6 आणि सीपीएमने 4 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, महागठबंधनला अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट भाजप एनडीए आघाडीने मोठा विजय मिळवला आहे.


गत 2020 च्या निवडणुकीत केवळ 43 जागा


बिहार विधानसभा निवडणुकीत गत 2020 मध्ये नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 74 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा 2025 च्या निवडणुकीत जदयूला 80 जागांवर आघाडी दिसून येत आहे. म्हणजेच गत निवडणुकीपेक्षा 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर, भाजपला 95 जागांवर विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीए आघाडीने गत निवडणुकीत 243 पैकी 125 जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये, हिंदुस्तानी आवाम मोर्चा 4 आणि विकासशील इंसान मोर्चाने 4 जागांवर विजय मिळवला होता. यंदाही भाजप एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचं दिसून येत आहे.  



बिहार 2020 निवडणूक निकाल


भाजप आघाडी - 243 पैकी 125


काँग्रेस आघाडी - 243 पैकी 110


महालोकतांत्रिक


सेक्युलर मोर्चा - 243 पैकी 6


लोकजनशक्ती पार्टी - 135 पैकी 1


अपक्ष - 1


पक्षनिहाय निकाल 2020


भाजप - 74


जदयू - 43


लोकजनशक्ती - 1


राजद - 75


काँग्रेस - 19


भाकप माले - 12


मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन - 5


भाकप - 2


भाकप मार्क्सवादी - 2


बसप - 1


अपक्षा - 1



हेही वाचा


बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार