Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Groupशिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. सध्यातरी या दोन्ही बाबी कुणालाच दिलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. शिवसेनेची शान असलेला धनुष्यबाण आता कुणालाही वापरता येणार नाही, एवढंच नाही तर शिवसेना पक्षाचं नावही वापरता येणार नाही. असं असलं तरी हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान आता ठाकरे गट आणि शिंदे गट पक्षाचं नाव म्हणून काय नाव वापरणार आणि पक्षचिन्ह काय निवडणार याची उत्सुकता लागली आहे. फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. पण, शिवसेनेशी संबंधित काहीही नाव घेता येईल. उदा. लोक जनशक्ती पक्षाच्या बाबतीत आपण पाहिलं तर राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) ही नावे दोन गटांना घ्यावी लागली होती. अशाच पद्धतीनं ठाकरे आणि शिंदे गट नावं घेऊ शकतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर दोन्ही गटांकडून शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) अशी नावं घेतली जाऊ शकतात. 


चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटाचा प्लॅन बी काय?


चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का? कारण बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्हाचं संकेत देण्यात आले होते. शिंदे गटाची निशाणी “तलवार” असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी “गदा” हे चिन्ह असू शकते. बुधवारी झालेल्या या दसरा मेळाव्यात दोन्ही गटानं जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केलाय की काय असंत वाटत होतं. एकनाथ शिंदेंनी बीकेसीमध्ये तलावारीचं पूजन करून दसऱ्या मेळाव्याला सुरुवात केली होती तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतीर्थावर देखील शस्त्रपूजन करताना गदेचा वारंवार उल्लेख करण्यात आला. 


एकनाथ शिंदे यांचा बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळाव्यात 51 फूट तलवार दिसली होती. तलवारीचं भलमोठं लॅान्चिंग करण्यात आलं. मंचाच्याखाली भलीमोठी 51 फूट लांब तलवारीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी 12 फुट लांब चांदीची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली होती. 


चिन्ह दिलं कसं जातं ?


निवडणूक आयोगाकडे चिन्हांची एक यादी तयार असते. त्याच्याकडे विविध चिन्ह तयार असतात. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. याबाबत दोन्ही गटाला कळवलं देखील गेलं आहे आणि नव्या चिन्हासाठी 10 तारखेपर्यंत निर्णय होणार आहे.  निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह ही दोन्ही गटांसाठी आधी उपलब्ध असतील. जर निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह जर दोन्ही गटाला नको असतील तर त्यांच्याकडून आयोगाकडे विनंती केली जाईल. त्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आपल्याला हव्या असलेल्या चिन्हासाठी मागणी करतील त्यावर आयोग निर्णय घेईल. 


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.येत्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून याठिकाणी उमेदवारच दिला जाणार नाही, त्यामुळं शिंदे गटाला तसाही या निर्णयाचा विशेष फटका बसणार नाही. ठाकरे गटाला मात्र हा मोठा झटका आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या



Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?