मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना माफिया म्हटल्यापासून बंडखोरी केलेल्या अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली असून, "आमची पहिली बैठक झाली त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, आमचं कुटुंब तुमच्याकडे येत आहे. परंतु, कुटुंब प्रमुखाबद्दल कोणी बोलू नये, असे सांगितल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

  
 
किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपावरून एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये तेढ निर्माण झाले आहे.  दीपक केसरकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमय्या यांची खिल्ली उडवत भाजपला उद्धव ठाकरे यांना लक्ष्य न करण्याचा इशारा दिलाय. 


"किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं होतं, तेव्हा मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. शिव सेना  आणि भाजपची युती झालीय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणी काही बोलणार नाही असं सांगितलं आहे. माझ्याकडून देखील किरीट सोमय्या हे भाजपचे संजय राऊत आहेत का? असा उल्लेख करण्यात आला होता, परंतु तो मी मागे घेतो, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 


दीपक केसरकर म्हणाले, "आपल्याला एकत्र काम करायचं आहे , ठाकरे कुटुंबाचा मान राखला पाहिजे. आम्ही मनापासून एकत्र आलोय. संजय राऊत देखील काल बोलले. त्यांचं बोलणं हळू हळू सौम्य होईल.
मी कायम स्वरूपाचा प्रवक्ता नाही, महाराष्ट्रची संस्कृती राखली पाहिजे, ही भाषा महाराष्ट्राची नाही. उद्धव ठाकरे यांच्या मुद्यावर बोलणं योग्य नाही. परंतु, काही मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे."


"आदित्य ठाकरे यांच्यावर ज्या-ज्या वेळी आरोप झाले, त्यावेळी आम्ही सर्वांनी निषेध केला. त्यावेळी देखील आम्ही गप्प नव्हतो. भाजपच्या ज्या नेत्यांनी मातोश्रीवर आरोप केले त्यांनी भाजपच्या मांचाच वापर केला. पण त्याला भाजपच्या 80 टक्के आमदारांनी भाजपच्या प्लॅटफॉर्मचा वापर व्हायला नको ही भूमिका घेतली, असे दीपक केसरकर म्हणाले. 


दीपक केसरकर म्हणाले, "पक्ष चिन्हावर अजून कोणीच दावा केलेला नाही. शिवसेना विधिमंडळ पक्ष आहे, शिवाय सेना-भाजपचं राज्य आहे. आता आम्ही एकटे नसून युती झाली आहे. आता वेगळं होणं नाही, नवीन संसार ठरल्यावर समोरच्यांना पण विचारावं लागतं, त्यामुळे पंतप्रधन मोदींसोबत बोला अशी भूमिका आहे."


महत्वाच्या बातम्या


'उद्धव ठाकरे आमचे नेते; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही' : दीपक केसरकर