Sushant Singh Rajput case : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवरील (Aditya Thackeray) आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईपेक्षा बिहार पोलिसांच्या तपासावर तुमचा जास्त विश्वास आहे का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येआधी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. त्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता अरविंद सावंत सांनी देखील जोरदार टीका केली आहे. 


लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलाय. परंतु, सभागृहात उपस्थित नसणाऱ्या व्यक्तिचे नाव घेता येत नसल्याने सभागृहातून ते वक्तव्य वगळण्यात आल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिलीय. "आदित्य ठाकरे सभागृहात नसताना त्यांचं नाव घेणे हा अनुचित प्रकार आम्ही पिठासीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर ते वक्तव्य सभागृहातून वगळण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या विरोधानंतर ते वक्तव्य कामकाजातून वगळण्यात आलंय, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिलीय. मुळात ज्यांच्या चारित्र्याचा पत्ता नाही त्यांनी अशा गोष्टींवर बोलू नये. सीबीआयने क्लीन चीट दिली त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? मुंबईपेक्षा बिहार पोलिसांवर अधिक विश्वास आहे का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय. 

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते. परंतु, मुंबई पोलिसांनी एयू म्हणजे रियाची मैत्रिण अनन्या उधास असल्याचं महटलं होतं. मात्र, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. 


Sushant Singh Rajput case :  राहुल शेवाळेच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक


दरम्यान, राहुल शेवाळेंच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. शेवाळेंच्या विरोधात ठाकरे गट उद्या 11 वाजता चेंबुरमध्ये आंदोलन करणार आहे.  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे विभाग क्रमांक 9 चे विभागप्रमुख  नगरसेवक मंगेश श्रीधर सातमकर यांच्या नेतृवाखाली राहुल शेवाळे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्ध "शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,चेंबुर नाका येथे आंदोलन करण्यात आले आहे.  


महत्वाच्या बातम्या
 


Shiv Sena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, संजय राऊतांचे निकटवर्तीय शिंदे गटात