मुंबई : आमदार अपात्रता सुनावणीत (MLA Disqualification) पुन्हा आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची (Sunil Prabhu) उलटतपासणी सुरू आहे. 22 जूनच्या पत्राबाबत प्रभूंनी काल परस्पर विरोधी विधानं केल्याचा युक्तीवाद महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रावरून प्रतोद सुनील प्रभू यांना प्रश्न विचारण्यात आले. या पत्राबाबत प्रभूंनी परस्पर विरोधी विधानं केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलाय. शिंदेंना मेल पाठवला असं आधी म्हणाला, मात्र नंतर आपण मेल पाठवल्याचं म्हटलंय असा सवाल जेठमलानींनी केलाय. मात्र आपल्याला ईमेल लेटर म्हणायचं होतं असं उत्तर प्रभूंनी दिलंय. eknath.shinde@gmail.com या मेल आयडीवर आपण मेल पाठवल्याचं म्हणता मात्र तो मेल आयडी एकनाथ शिंदे यांनी कधीही वापरलेला नाही किंवा त्यांच्या कार्यालयाचाही हा मेल आयडी नाही असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केलाय. मात्र हा दावा प्रभूंनी फेटाळला.


जेठमलानी : काल दुपारी आपण परस्पर विरोधी विधान केले आहे..जोशी यांनी एकनाथ शिंदे यांना नोटीस ही मेल केली असे आपण सांगितले पण नंतर आपण बोललात की पत्र पाठवले आहे


प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे


माहितीसाठी- ( 23 जून 2022 ला मेल केला आहे ज्यामध्ये आपण 23 जून च्या वर्षावर होणाऱ्या बैठकीसाठी आपण उपस्थित राहावे अन्यथा कारवाई केली जाईल अश्या आशयाचा हे पत्र नोटीस आहे जी एकनाथ शिंदे यांना पाठवली होती)


जेठमलानी : परिच्छेद 50 मध्ये तुम्ही म्हणताय की मेल आम्ही पाठवला होता अस म्हणताय आणि नंतर तुम्ही पत्र पाठवला अस म्हणताय?खरं काय आहे ?


प्रभू: परिच्छेद 50 मध्ये मला इमेल लेटर म्हणायचे राहून गेले त्यात फक्त पत्र म्हणालो 


जेठमलानी : तुम्ही एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 ला पाठवलेला पत्र ते सादर करण्यास सांगितले तर तुम्ही 23 जून 2022 ला पाठवला इमेल लेटर सादर केला आहे 


प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे


जेठमलानी : आपत्रता याचिकेत सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला इमेल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सादर केलला मेल एकच आहे का ?


प्रभू : रेकॉर्ड वर आहे


जेठमलानी : एकाच पत्रावर दोन्ही तारीख असू शकत नाही...एक तर 22 जून 2023 तारीख असेल किंवा 23 जून 2023 तारीख असू शकते ? तारीख पत्रावर कोणती आहे 


प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे


जेठमलानी : दोन कागदपत्रे लेटर रेकॉर्ड वर आहे.एक 22 जून आणि दुसरा 23 जून 2022 चा तुम्ही सांगा कोणतं पत्र तुम्ही पाठवले होते?


प्रभू : दिनांक 22 जून ला सांगितलं होतं की पत्र पाठवायला ते सुद्धा मेलद्वारे पाठवायला सांगितले


जेठमलानी: मग हे लेटर किंवा तुम्ही मेल म्हणताय तो कधी पाठवला


प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे 


जेठमलानी : जर सर्वोच्च न्यायालयात दाखल अपात्रता याचिका आणि प्रतिज्ञापत्रात तुम्ही 22 जून रोजी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असे म्हणताय तर 23 जूनला पत्र (मेल) पाठवला कसे म्हणताय ? खर काय आहे तुम्ही पत्र कधी पाठवले ?


जेठमलानी : तुम्ही जो मेल सादर केला त्यात तारीख 23 जून 2022 आहे हे कसं ?


प्रभू : मी 22 जून 2022 ला सूचना केल्या होत्या की पत्र पाठवा, परंतु पाठवताना उशीर झाला असेल त्यामुळे इमेल लेटर 23 तारखेला गेले असेल


जेठमलानी : आपण हा एकनाथ शिंदे यांना पाठवलेला इमेल पहिल्यादा काल पाहिला का? 


प्रभू : हो,  काल जेव्हा विषय निघाला मी माहिती घेतली तेंव्हा मेल मी कव्हर पेज पहिल्यादा पाहिलं 


जेठमलानी : एकनाथ शिंदे यांना पाठवलेला पत्र जे 22 जून 2022 रोजी पाठवला अस तुम्ही म्हणत होता ते 23 जून 2022 ला पाठवला हे तुम्हला सुद्धा काल पहिल्यादा कळलं हे खरं आहे का ? 


प्रभू : हो हे खरं आहे


जेठमलानी : जे पत्र तुम्ही 23 तारखेला पाठवला अस तुम्हला काल पहिल्यादा कळलं ते पत्र याचा अर्थ आतापर्यत अस्तित्वातच नव्हतं हे खरं आहे का ?


प्रभू : हे खोटं आहे


जेठमलानी : कोणत्या मेल आयडी वर तुम्ही हे मेल लेटर पाठवला


प्रभू : ऑन रेकॉर्ड 


जेठमलानी : eknath.shinde@gmail.com  या मेल आयडी वर तुम्ही मेल पाठवला अस म्हणताय तो मेल आयडी एकनाथ शिंदे यांनी कधीही वापरलेला नाही किंवा त्याच्या कार्यलायचा सुद्धा हा इमेल आयडी नाही


प्रभू : हे खोटं आहे


जेठमलानी : प्रश्न क्रमांक 210 चा उत्तर तुम्ही जे दिलाय ते व्यक्तिगत माहितीच्या आधारे दिले आहे का ?


प्रभू : जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार माहिती दिली


जेठमलानी : आपण ज्या माहितीच्या आधारे उत्तर देताय ती माहिती कुठून मिळाली


प्रभू : विधिमंडळ पुस्तकात सर्वांचे मेल आयडी असतात. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय जे असते त्यात पक्ष किंवा सचिव मेल आयडी देत असतात. तिथे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर मेल केला गेला


जेठमलानी : दिनांक 23 जून 2022 रोजी जो मेल पाठवला गेला तो कथित मिळलेल्या माहिती पुस्तकाच्या आधारे   पाठवला गेला हे तुम्ही कसे म्हणू शकता ?


प्रभू : सर्व इमेल हे पक्ष कार्यलयात उपलब्ध इमेल किंवा आमादारांच्या सचिवांनी दिलेल्या इमेल आयडीवर पाठवले जातात


जेठमलानी : जून 2022 अशी कुठलीही माहिती पुस्तिका पक्षाच्या कार्यलयात उपलब्ध नव्हती.पक्षाच्या सचिवायलाकडे सुद्धा उपलब्ध नव्हती आणि जो मेल आयडी एकनाथ शिंदे यांचा येथे वापरण्यात आला तो एकनाथ शिंदे यांचा नाही.. यावर तुमचे काय म्हणणं आहे 


प्रभू : हे खोटं आहे


जेठमलानी : मेल जर तुम्ही पाठवला म्हणतात तर मग रीड रिसीप्ट (इमेल वाचकाने वाचला आहे)हे  सादर करू शकता का ? 


प्रभू :  मी आता सांगू शकत नाही


जेठमलानी : रीड रिसीप्ट असेल तर ती कृपया मिळू शकेल का ? 


प्रभू : सर्व कागदपत्रे ही पक्ष कार्यलयात होती आणि पक्ष कार्यालय सुद्धा आता त्यांच्याकडे आहे


जेठमलानी : तुम्ही शिवसेनेची घटना वाचली आहे का ? तुम्ही प्रतिज्ञापत्र मधील परिच्छेद 8, 10, 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेचा संदर्भ दिला आहे


प्रभू: मी घटना वाचली आहे


जेठमलानी : प्रतिज्ञा पत्रात परिच्छेद 8 मध्ये आपण पक्षाच्या सुधारित घटनेचा संदर्भ दिला आहे...ही घटना कधी सुधारित करण्यात आली? 


प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे


जेठमलानी : हे ऑन रेकॉर्ड नाहीये


प्रभू : जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार आहे


जेठमलानी : परिच्छेद 8 मध्ये तुम्ही म्हणताय की घटना दुरुस्ती झाली होती ही तुम्हाला माहिती कोणी दिली आहे ?


प्रभू : प्रातिनिधिक सभा झाल्यानंतर अनिल देसाई यांनी जी माहिती इलेक्शन  कमिशनच्या वेबसाईटवर सादर केली होती त्यानुसार आम्ही घेतली