कर्जत : अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने आज दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या शिबिरामध्ये आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची (Election 2024) तयारी करण्यात येणार आहे.
आज संध्याकाळी अजित पवार राष्ट्रीय कार्यकारणी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी सुरू असताना आज अजित पवार यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणे यासोबत अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या बैठकीत सहभागी होणे महत्त्वाचे मानलं जात आहे.
राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार
सुनिल तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, आगामी काळात येणार लोकसभेच्या निवडणुका, पक्ष , पक्षाचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती शिबिराला मार्गदर्शन करणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या समारोपीय भाषणाने शिबिराची सांगता होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे.
दरम्यान सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना आज संबोधित केले. सुनील तटकरे म्हणाले, 2004 साली युपीए सरकारं होत. त्याआधी 1999 साली डीएमके सरकार मध्ये सहभागी झालं होतं. त्यामुळं आम्हीच म्हणजेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहभागी आम्ही झालो म्हणजेच वेगळं काही केलं असं नाही. 62, 67, 72 साली काँग्रेस सरकार होतं त्यानंतर आणीबाणी आली त्यानंतर काँग्रेस मध्ये फूट पडली. काँग्रेसच बहुमत असताना देखील काँग्रेस मध्ये विभाजन झालं. 1978 साली निवडणुका झाल्या. यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक सरकारमध्ये सहभागी झाले होते.1980 साली इंदिरा गांधी आल्या. 1995 पर्यंत एकहाती सत्ता आली त्यानंतर भाजप शिवसेना सरकारं स्थापन झालं. त्यानंतर आपण सरकार स्थापन करु शकलो असतो. 45 अपक्ष आमदार निवडून आले. काँग्रेस पक्षाने अत्यंत जहरी टीका शरद पवार यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. सत्तेसाठी आपण सहभागी झालो अशी टीका होत आहे.
हे ही वाचा :
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल, शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा