Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रेतवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु आहे. नागपूर विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी पार पडतेय. दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची उलटतपासणी संपली. 72 प्रश्न यावेळी सामंतांना विचारण्यात आले. त्यांनी त्यांच्या उलटतपासणीमध्ये उत्तरं देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केलीये. आता उदय सामंत यांच्या सुनावणी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या सुनावणीला सुरुवात झालीये.
आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
अनिल साखरे - ( शिंदे गटाचे वकील)
तुम्हाला 4 जुलैला व्हीप कधी आणि कुठे मिळाला?
केसरकर : 4 जुलै 2022 ला सकाळी मला प्रेसिडेंट हॉटेलला व्हीप मिळाला. नंतर मी गोगावले यांच्यासोबत विधिमंडळ येथे गेलो.. जे आमदार मला भेटले नव्हते त्यांचे व्हीप मी टपाल पेटित ( पीजन होल) टाकले. त्यांनी मूळ व्हीप मला दाखवला होता. मूळ व्हीप मला भरत मारुती शेठ गोगावले यांनी दाखवला.
कामत : 4 जुलै 2022 रोजी तुम्हाला किती वाजता व्हीप देण्यात आला
केसरकर : मला सकाळी देण्यात वेळ आठवत नाही
कामत : हॉटेल प्रेसिडेंटमध्ये तुमच्या सोबत किती आमदार होते
केसरकर : मला आठवत नाही
कामत : भरत गोगावले यांच्या हातात व्हीपच्या किती प्रति होत्या
केसरकर : मी मोजल्या नाही त्यामुळे मला माहित नाही
कामत : त्यांचा हातात एक व्हीप होता की अनेक प्रति होत्या
केसरकर : मी त्यांना टपाल पेटित व्हीप टाकताना पाहिले पण त्याच्या प्रति मोजल्या नाहीत
कामत : भरत गोगावले यांनी तुम्हाला व्हीपचा मूळ प्रत हॉटेलमध्ये दाखवली की विधान सभेत
केसरकर : हॉटेलमध्ये
कामत : तुम्हाला विधान सभेत व्हीपचा मूळ प्रत दाखवली नाही का?
केसरकर : त्यांच्या हातात मूळ व्हीप होता. मी त्यांच्या सोबत असल्यापासून तो त्यांच्या हातातच होता
कामत : त्यांच्या हातात असलेल्या व्हीपची मूळ प्रत होती की नक्कल प्रत होती. हे तुम्ही पाहिलं किंवा तपासल का?
केसरकर : मी त्यांना विचारलं की ते हे टपाल पेटित का टाकत आहात. तर त्यांनी उत्तर दिले.. जे आमदार मला भेटत नाही आहेत त्यांच्यासाठी हे पेटीत टाकत आहे. जे भेटतील त्यांच्या हातात ही प्रत दिली जाईल
कामत : टपाल पेटित टाकलेला व्हीपची मूळ प्रत होती की नक्कल प्रत होती हे तुम्ही तपासले नाही
केसरकर : मी त्यांना टपाल पेटीत टाकताना पाहिले ती प्रत मी तपासली नाही
कामत : ती व्हीपची मूळ प्रत होती की नक्कल प्रत होती याची वैयक्तिक माहिती तुम्हाला नाही हे खरं आहे का?
केसरकर : या प्रश्नाचे उत्तर मी नुकतेच दिले आहे
कामत : किती आमदाराच्या टपाल पेटीत या कथित व्हीपच्या प्रति टाकण्यात आल्या
केसरकर : मी त्या मोजल्या नाहीत
कामत : तुम्ही जी माहिती देत आहात ती चुकीची आहे
केसरकर : हे खर नाही
कामत : तुम्ही शिवसेनेत कधी प्रवेश केला
केसरकर : 2014
कामत : शिवसेनेत येण्या आधी तुम्ही शिवसेना विरोधात निवडणूक लढला का? आणि त्याची माहिती द्याल का?
केसरकर : होय.. मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून शिवसेना उमेदवार शिवराम दळवी यांच्या विरोधात 2009 ची विधानसभा लढलो.
कामत : बाळासाहेब हयात असताना त्यांच्या तत्वांशी तुमची निष्ठा नव्हती असा याचा अर्थ होतो का? आणि तुम्ही बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवारा विरोधात लढलात हे खरं आहे का?
केसरकर : हे खरं नाही..मी नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचा आदर केला आहे. आणि माझ्या जाहीर भाषणातही त्याचा उघडपणे उल्लेख केला आहे
शिवसेना पक्ष संघटनेत तुम्ही प्रतिनिधी सभा ऐकलं होतं का
केसरकर : हो मी प्रतिनिधी सभेबद्दल ऐकलं पण त्या निवडणुका झाल्या नाहीत
कामत : तुम्हाला प्रतिनिधी सभांच्या निवडणुका बद्दल कसे माहिती
केसरकर : निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर असलेल्या शिवसेनेच्या घटनेतून ही माहिती मिळाली
कामत : ही घटना असलेली निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ तुम्ही पाहिले आहे का?
केसरकर : मी माझ्या सहाय्यक कर्मचाऱ्याला या घटनेची प्रत काढायला सांगितले होते आणि ती प्रत मी वाचली
कामत : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राजकीय पक्षांच्या संघटनात्मक निवडणुकांची वेळोवेळी प्रकाशित केली जाते याची तुम्हाला माहिती आहे का?
केसरकर : मला माहिती नाही
कामत : शिवसेनेच्या 2013 ते 2018 आणि 2018 ते 23 या काळातील संघटनात्मक निवडणुकांची माहिती वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळांवर अपलोड केलेली आहे हे खरं आहे का?
केसरकर : मला याबाबत माहिती नाही
कामत : (केसरकर यांना 27 फेब्रुवारी 2018 चे एक पत्र दाखवण्यात आले)
कामत : तुम्ही पहिले कागदपत्रे केव्हा पाहिली
केसरकर : हे पत्र मला माझ्या वकिलाने दाखवले. याची प्रत त्यांना विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून मिळाली असे त्यांनी मला सांगितले
कामत : हे कधी मिळाले याचे उत्तर द्याल का?
केसरकर : मला खरंच सांगता येणार नाही. मला वकिलांनी असे सांगितले की याचिककर्त्यांनी अध्यक्ष कार्यालयात ही प्रत दाखल केली होती
कामत : तुम्ही तुमच्या उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्या आधी की दाखल केल्यानंतर ही प्रत तुम्हाला मिळाली
केसरकर : मी माझं उत्तर दाखल करण्यापूर्वी
कामत : (केसरकर यांना एक कागदपत्रे दाखवत आहेत)
कामत : तुम्ही या कागदपत्राशी सहमत आहात का?
केसरकर : मी या कागदातील मजुकराशी सहमत नाही. कारण की 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असतो त्यामुळे आम्ही त्या दिवशी तिथे होतो मात्र कुठलीही निवडणूक झाली नाही.
तुम्ही तुमच्या याचिकेत हे फेटाळले का नाहीत
केसरकर : रेकॉर्डवर आहेत. मी कशाला फेटाळू
कामत : रेकॉर्डवर काय आहे
केसरकर : हे पत्र रेकॉर्डवर आहे
कामत : शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुका 23 जानेवारी 2018 रोजी झाल्या आणि त्याच्या निकालाची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली हे खरं आहे का?
केसरकर : मला माहिती नाही
कामत : तुम्ही 2018 च्या संघटनात्मक निवडणुकांच्या निकालाला कधी आव्हान दिले आहे का?
केसरकर : मला याबद्दल माहिती नाही. मी आव्हान दिलेलं नाही
कामत : तुम्हाला याबाबत माहिती मिळाल्या नंतर तुम्ही आव्हान का दिले नाही
केसरकर : हे रेकॉर्डवर आहे
कामत : कुठल्याही कोर्टात किंवा आयोगात 2018 च्या निवडणुक निकालाला कुठल्याही पक्षकार किंवा व्यक्तीने आव्हान दिलेलं नाही हे खर आहे का?
केसरकर : मला याबद्दल माहिती नाही
कामत -
तुम्ही किंवा तुम्ही ज्यांना नेते म्हणता त्यांनी याआधी कधीही हिंदुत्व विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली नाही. हे खरे आहे का?
केसरकर : हे खरे नाही. मी वारंवार उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत जाण्याचा विनंती केली होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी भाजपची विचार करणे मिळतीजुळती आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची बैठक घेण्यासाठी मध्यस्थी केली होती. 8 जून 2021 रोजी ज्यावेळी मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर होते, या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर फक्त उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या बैठकीत काय झाले? याची माहिती मला उद्धव ठाकरे यांच्या कडून मिळाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले होते, अशी माहिती मला मिळाली. मुंबईत पोहचल्यानंतर 15 दिवसांच्या आत महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून युतीची पुर्नस्थापना करण्याचा शब्द नरेंद्र मोदींना दिला होता. परंतु मला माझ्या सहकाऱ्यांची समजूत घालण्यासाठी अधिकचा वेळ लागेल, असा निरोप मी मोदीजी यांना द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते. हा निरोप मी दिल्लीला पोहचवण्यासाठी व्यवस्था केली. दोन्ही पक्षांनी एकत्र यावे ही पक्षातील बहुतेक लोकांची इच्छा होती. त्यामुळे सदर बाबीस वेळ होत असल्याने मी माझ्या पक्षातील काही ज्येष्ठ लोकांना याची माहिती दिली. त्यामध्ये सुभाष देसाई, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांना माहिती दिली आणि त्यांना याबाबतचा निर्णय लवकर होण्याबाबत उद्धवजींना विनंती करावी, अशी विनंती केली.
कामत -
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर भाजप सोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार होते? हे खरे आहे का?
केसरकर -
होय, ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना निर्णय घ्यायचा होता.
कामत -
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, आणि ते शिवसेना पक्षप्रमुख असल्यामुळे शिवसेनेतर्फे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना होते. हे खरे आहे का?
केसरकर -
त्यांना मुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्यायचा होता आणि त्यांना त्याची माहिती राज्यपालांना द्यायची होती. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने आम्ही त्यांना आदराने पक्षप्रमुख म्हणून संबोधित करायचो. मला निवडणूक आयोगातील त्यांचे पद माहिती नव्हते.
कामत -
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर भाजप सोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार होते? हे खरे आहे का?
केसरकर -
होय, ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना निर्णय घ्यायचा होता.
कामत -
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, आणि ते शिवसेना पक्ष प्रमुख असल्यामुळे शिवसेनेतर्फे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना होते. हे खरे आहे का?
केसरकर -
त्यांना मुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्यायचा होता आणि त्यांना त्याची माहिती राज्यपालांना द्यायची होती. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने आम्ही त्यांना आदराने पक्षप्रमुख म्हणून संबोधित करायचो. मला निवडणूक आयोगातील त्यांचे पद माहिती नव्हते.
कामत -
भाजपसोबत युती करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी कधी घेतला?
केसरकर -
मी उद्धव ठाकरे यांना विनंती केली की एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक असल्याने त्यांना कॉल करा. त्यांच्या सोबत चर्चा करून हा वाद मिटवा. ज्यावेळी मी त्यांना हे सांगितले त्यावेळी माझ्यासोबत केबिनमध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील असे पक्षातील वरिष्ठ आमदार व मंत्री होते.
कामत -
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय शिवसेना राजकीय पक्ष म्हणून कोणी घेतला?
केसरकर -
मला माहिती नाही
कामत -
उद्धव ठाकरे यांच्या आधी शिवसेना राजकीय पक्षाचा पक्ष प्रमुख कोण होते?
केसरकर -
मला माहिती नाही
कामत -
उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख व पक्षाचे अध्यक्ष होते. शिवसेना राजकीय पक्ष म्हणून तेच निर्णय घेत होते. हे खरे आहे का?
केसरकर -
मला माहिती नाही
कामत -
महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय ते मुख्यमंत्री असल्यामुळे नव्हे तर शिवसेना राजकीय पक्ष प्रमुख व अध्यक्ष असल्याने घेऊ शकत होते. हे खरे आहे का?
केसरकर -
मला माहित नाही
कामत -
याआधी तुम्ही सांगितले की उद्धव ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांना समजावणार होते. ते सहकारी कोण?
केसरकर -
मला त्यांचे सहकारी म्हणजे कोण हे माहिती नाही.
कामत -
तुम्ही म्हटले की उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय घ्यावा, या लवकरमधून काय साध्य होणार होते?
केसरकर -
काहीच नाही.
कामत -
उद्धव ठाकरे यांची ही विनंती मान्य केली की नाही?
केसरकर -
मला माहिती नाही
कामत -
तुमचे याआधीचे उत्तर अर्धसत्य आणि खोटे अणि वादग्रस्त आहे. हे खरे आहे का?
केसरकर -
हे खरे नाही.
कामत -
तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्र आणि पुराव्यांमध्ये हे उत्तर नमूद का केले नाही
केसरकर -
त्यावेळी ते महत्त्वाचे आहे असे वाटले नाही